Posts

२०२१ कडुन २०२२ कडे..!

 मित्र हो, आज २०२२चा पहिला दिवस.... मला विश्वास आहे आपल्याला २०२१ खास गेला असेल‌..😇😉🙂 माझ्या वरील वाक्यावर आपल्यापैकी काही प्रतिक्रिया खालील प्रकारे असतील.. १)२०२१ ठिक होते २)मस्तच होते ३)काय विचारतो मित्रा ,?कोविडने पुर्ण वाट लावली आहे.😌 आपले उत्तर वरीलपैकी किंवा काही वेगळे असू शकेल. पण नववर्षाच्या स्वागत करताना मला आपल्या सर्वांना काही शेअर करायचे आहे. मित्रहो, आपण यशस्वी/अयशस्वी असाल , सध्या संघर्ष करत असाल,उध्वस्त असाल तरीही... एक गोष्ट लक्षात घ्या..  *जगातील सर्वोत्तम कंपन्यांमध्ये* कर्मचाऱ्यांना नोकरीवर ठेवताना किरकोळ डॉक्युमन्टेशन बरोबर महत्वाची बाब बघितली जाते ती म्हणजे .. तुम्ही तुमच्या कामामध्ये, आयुष्यामध्ये, संकटांमध्ये,  अपयशामध्ये,आव्हानात्मक परिस्थितीमध्ये कशाप्रकारे लोकांना रिस्पॉन्स देता... मित्रहो, आपण आपल्या व्यवसायिक/ नोकरीच्या समस्यांनी त्रस्त असाल तर निराश होऊ नका.. तणावपूर्ण स्थिती कमी प्रयत्नशील राहा.. सकारात्मक राहा..  *कोणत्याही स्थितीमध्ये आपल्या ध्येयाचा पाठलाग थांबवू नका..*   *आजुबाजुला काळजीपूर्वक पहा..*  धडाधड व्यवसाय बंद होताहेत, बरेच लोक बेरोजगार हो